अमेरिकेच्या निवडणुकीत धडकी भरवणारा निकाल; डोनाल्ड ट्रम्प यांचा दारुण पराभव, डेमोक्रेटीक पक्षाची बहुमताकडे वाटचाल

Foto
वॉशिंग्टन :  अमेरिकेच्या मध्यावधी निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प  यांचा दारुण पराभव झाला आहे. काँग्रेसच्या सिनेट आणि प्रतिनिधीगृहामध्ये डेमोक्रेटीक पक्षाला बहुमत मिळालं आहे. प्रतिनिधीगृहात डेमोक्रेटीक पक्षांनी आतापर्यंत २१९ जागा जिंकल्या आहेत. ४३५ पैकी ३४५ जागांचे निकाल जाहीर झाला असून डोनाल्ड ट्रम्प यांच्या रिपब्लिकन्स पक्षाला फक्त १२६ जागा मिळाल्या आहेत. सिनेटमध्येही डेमोक्रेटीक्सना स्पष्ट बहुमत मिळाले आहे. सिनेटमध्ये रिपब्लिकन्सना फक्त ४१ जागा जिंकता आल्या. तर डेमोक्रेटीक पक्षांनी सिनेटमध्ये ५३ जागांवर विजय मिळवला.
 
जगातील सर्वात शक्तिशाली राष्ट्राध्यक्ष आपली महत्त्वाची परीक्षा उत्तीर्ण होऊ शकले नाहीत. अमेरिकेच्या मध्यवर्ती निवडणुकांमध्ये ट्रम्प यांचा मोठा पराभव झाल्याचे दिसून येत आहे. केवळ डेमोक्रॅट्सनी सिनेटमध्ये बहुमत मिळवले आहे असे नाही, तर डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्वतःच्या रिपब्लिकन पक्षाचे उमेदवारही त्यांच्या पारंपरिक बालेकिल्ल्यांमध्ये पराभूत झाले आहेत. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा रिपब्लिकन पक्ष पराभूत झाला आहे. विरोधी डेमोक्रॅटिक पक्षाने ५२ जागा जिंकून सिनेटमध्ये बहुमत मिळवले आहे. त्याचबरोबर, हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हजमध्येही डेमोक्रॅट्सनी सुमारे २०० जागा जिंकल्या आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावरील काही पोस्टद्वारे आपला पराभव मान्य केला आहे. 

मंत्रिमंडळातील सदस्यांच्या नियुक्तीवर डोनाल्ड ट्रम्प यांचे आता पूर्ण नियंत्रण राहणार नाही. इराणसोबतच्या संभाव्य युद्धाच्या बाबतीत ट्रम्प आता मनमानी करू शकणार नाहीत. परराष्ट्र धोरणाच्या आघाडीवर देखील डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा फटका बसणार आहे. कायदे आणि अर्थसंकल्पीय विधेयकांवर संघर्ष होण्याचीही शक्यता आहे. 

बराक ओबामा काय म्हणाले? 
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनीही मध्यावधी निवडणुकीच्या निकालांवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. आज रात्री अमेरिकेतील जनतेने एक स्पष्ट संदेश दिला आहे. त्यांना फूट पाडणारे नव्हे, तर लोकांना एकत्र आणणारे राजकारण हवे आहे. तसेच, जनतेसमोरील आव्हानांवर ठोस उपाय सूचवणारे नेतृत्व त्यांना अपेक्षित आहे. देशाच्या प्रत्येक भागातून उत्कृष्ट उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले, त्यामुळेच हे निकाल शक्य झाले. यामध्ये पूर्वी जिंकण्याच्या दृष्टीने कठीण मानल्या जाणार्‍या मतदारसंघांतील उमेदवारांचाही समावेश होता.